माझा नाट्य प्रवास  

आज माझ्या नाट्य प्रवासाला ३९ वर्षे झाली . पण खरं सांगायचं तर सुरवातीला मी इथपर्यत पोहचेन कि नाही हे माहीत नव्हतं. पण मेहनत घ्यायची तयारी पूर्वीपासून होतीच . पण त्याच बरोबरी ने माझ्या कुटुंबियांचे सहकार्य, आप्तेष्टांच्या सदिच्छा आणि रसिकांनी भरभरून केलेल्या प्रेमामुळेच मी १२,५०० चा टप्पा पार करू शकलो .
आजच्या दिवशी मागे वळून पाहताना , भूतकाळात डोकावताना अनेक व्यक्तींची , महत्वाच्या घटनांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही . या साऱ्या आठवणी मला माझ्या प्रिय रसिकांसोबत उलगडू वाटत आहे.