• १९८३
  • १९८४
  • १९८५
  • १९८६
  • १९८८
  • १९८९
  • १९९०
  • १९९१
  • १९९२
  • १९९३
  • १९९४
  • १९९५
  • १९९६
  • १९९७
  • २००१
  • २००१
  • २००४
  • २००५
  • २००६
  • २००८
  • २००९
  • २०१०
  • २०११
  • २०१२
  • २०१३
  • २०१५
  • २०१५
  • २०१६
  • २०१८
  • २०२२
  • २०२४
  • २०२४
  • १९८३

    टुर टुर

    १९८३ साली टुरटुर नाटकाद्वारे माझ्या व्यावसायिक नाटय कारकिर्दीला सुरुवात झाली . त्यात मला एका मद्रासी माणसाची भूमिका कारायला मिळाली . अर्थात मी कोणत्याही बाजू ने मद्रासी दिसत नसलो तरीही . जो माणूस हि भूमिका करायचा तो न आल्याने हि भूमिका मला करावी लागली . या मध्ये मला लक्ष्मीकांत बेर्डे , सुधीर जोशी , विजय कदम यांसारख्या कसलेल्या कलावंतासोबत काम करण्याची संधी मिळाली . यातही गमतीचा भाग म्हणजे मुळात मी गोरा असल्याने 'मद्रासी माणूस ' करताना माझ्या चेहरयावर काळा रंग फासायला लागायचा .

    प्रयोग - ५४३

  • १९८४

    महाराष्ट्राची लोकधारा

    टूरटूर नंतर मला शाहीर साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारेसाठी मंगेश दत्तला मदतनीस म्हणून काम करायला बोलावले . यामध्ये ३५-३६ गाणी होती , पण तेव्हापासूनच माझ गाणं पाठ होण्याचा जरा 'प्रोब्लेम' होता त्यामुळे शेवटी मी ती बघून गाता येतील या अटीवर हा कार्यक्रम स्वीकारला . यामुळे मला महाराष्ट्रातील लोकसंगीताचा जवळून परिचय झाला आणि माझा आवाज तयार होण्यामध्ये या कार्यक्रमाने मोलाचा वाटा उचलला .

    प्रयोग - ४४३

  • १९८५

    मोरूची मावशी

    वैयक्तिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा
    'माझं लग्न '

    १ जाने १९८५ ला माझं 'मोरूची मावशी ' हे नाटक आलं . यामध्ये मी , विजय चव्हाण , प्रदीप पटवर्धन , विजय साळवी , जयश्री जोशी , विभाकर बिवलकर अशी टीम होती .या नाटकाद्वारे माझं एकाप्रकारे प्रमोशन झालं अस म्हणायला हरकत नाही. कारण टूरटूर मध्ये मी ४ नंबरची भूमिका करायचो पण यात मी ३ नंबरची 'मोरूची' भूमिका करायला मिळाली . या नाटकात मला २ गाणीही मिळाली .त्यामुळे 'सहयाद्री' वाहिनी वर टांग टिंग टिंग हे गाणं खूपच गाजत होतं . १८२ व्या प्रयोगापासून साधारण ८५० प्रयोगांपर्यंत आम्ही सातत्याने 'हाउसफुल ' चे बोर्ड घेतले . आमचा टीमवर्क अतिशय उत्तम होतं .

    माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्येही हे साल खूप महत्वाचे आहे . २७ डिसेंबर १९८५ रोजी माझं लग्न झालं . माझ्या लग्नानंतर लगेचच दोन दिवसांनी सलग तीन प्रयोग असल्याने मला घराबाहेर पडावे लागले . नवीन लग्न झालेले असूनही याची तक्रार माझ्या पत्नीने केली नाही . तिने वेळोवेळी दाखवलेल्या समजूतदारपणामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो.

    प्रयोग - ११३०

  • १९८६

    ब्रम्हचारी

    ब्रम्हचारी हे नाटक म्हणजे माझ्या कारकिर्दीतील 'मैलाचा दगड ' आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण या नाटकाद्वारे मी पहिल्यांदा 'हीरो' म्हणून लोकांच्या समोर आलो.या नाटकात माझ्यासोबत वर्षा उसगावकर होती . या नाटकातही गाणी होती .अशोक पत्कींनी सर्वच गाण्यांना अप्रतिम चाल दिली होती .यातील एक गंमत म्हणजे १९८६ सारख्या काळी ,मी तरुण होतो तेव्हा मला वर्षा उसगावकर ला उचलण्याचा एक प्रसंग होता.मला या प्रसंगावेळी अक्षरशः छातीत धडधड व्हायची पण सुधीर भट ,अशोक पत्की आणि स्वतः वर्षा यांच्या प्रोह्त्सानामुळे मी तो प्रसंग करू शकलो .या नाटकाच्या जाहिरातीमध्ये माझा आणि वर्षाचा फोटो असायचा याच नेहमीच मला अप्रूप वाटे .

    प्रयोग - ५०३

  • १९८८

    चंदनाचा जन्म झाला

    लग्नाची बेडी

    १९८८ - साली एक महत्वाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट झाली ती म्हणजे मी पहिल्यांदा 'बाबा ' झालो. मला मुलगी चंदना झाली.

    आचार्य अत्रेंच लग्नाची बेडी हे आणखी एक अजरामर नाटक माझ्या वाटयाला आल हे मी माझं भाग्य समजतो. यात मी 'पराग ' हि भुमिका करायचो. या नाटकाचेही जवळपास ३८५ प्रयोग झाले. यात माझ्यासोबत जनार्दन लवंगारे, संजय मोने, मधुकर तोरडमल, अनंत जोग, आणि रश्मीच्या भूमिकेत अश्विनी भावे होती. एक टीम म्हणून आमची उत्तम गट्टी जमली होती.

    प्रयोग - ३८५

  • १९८९

    प्रीतीसंगम

    या नाटकाचा विषय जरी कालबाहय असला तरीही आपल्या संस्कृतीची जोपासना करणारा विषय असं या नाटकासंबंधी बोलता येईल . या नाटकात मला पहिल्यांदाच 'गेटअप' करावा लागला. या नाटकासाठी मला टक्कल लावावे लागले. याही नाटकात उत्तम गाणी होती. या नाटकात जादूचे प्रयोग असायचे, त्यामुळे हे करताना मजा यायची. या नाटकात मोहन जोशी, चंदू पारखी, शमा वैद्य, अशी आमची टीम होती. दुर्दैवाने या नाटकाचे फक्त ३५ प्रयोग झाले. माझ्या कारकीर्दीतील हे एकमेव नाटक आहे ज्याचे १०० च्या खाली प्रयोग झाले. पण तरीही हे करताना आम्हाला अतिशय मजा यायची.

    प्रयोग - ३५

  • १९९०

    पाहुणा - ३६०

    चल काहीतरीच काय - १८०

    माझ्या कारकिर्दीतल पहिलच गंभीर थाटातील हे नाटक होतं . या नाटकात मी स्ट्रगलींग गायकाची भुमिका करत होतो. या नाटकात उषा नाडकर्णी, अरुण नलावडे, सोनिया परचुरे अशी तगडी मंडळी होती.
    चल, काहीतरीच काय -
    मोरूची मावशी नंतर तब्बल पाच वर्षांनी मी आणि प्रदीप पटवर्धनने एकत्र काम केलं. आमचं ऑनस्टेज आणि एरवी ही अतिशय उत्तम टयुनिंग जमतं. हे नाटक फार्स असल्याने याला स्पीड खूप असायचा. हे करताना खूप मजा यायची.

    एकूण प्रयोग - ५४०

  • १९९१

    बरा सापडलास

    दिग्दर्शक अरुण नलावडे मुख्य भूमिका प्रशांत दामले अरुण नलावडे प्रिया बेर्डे
    लेखक राजा गावडे

    प्रयोग - १०३

  • १९९२

    गेला माधव कुणीकडे

    ५ डिसेंबर १९९२ रोजी हे नाटक सुरु झालं आणि ६ डिसेंबरला बाबरी मशीद पडल्याने दंगल उसळली. त्यामुळे गेला माधव दंगलीकडे असं होतंय की काय अशी शंका आली. मात्र वसंत सबनीस यांनी ते इतका घट्ट वीण असलेल नाटक लिहिलंय की आजही करताना मजा येतेच पण प्रेक्षकही अजून एंजॉय करतात. आज २० वर्ष झाली हे नाटक चालू आहे. आजवर १७४५ प्रयोग झाले या नाटकाचे पण तरीही हे करताना तितकीच मजा येते. सर्वात महत्वाचं म्हणजे हे नाटक इतकं तुफान सुरु होतं की या नाटकाच्या बळावर मी माझी BEST ची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

    प्रयोग - १८२२

  • १९९३

    कंकनाचा जन्म झाला

    आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी धाकटी मुलगी 'कंकना ' चा जन्म. १९९३ साली माझं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं.

  • १९९४

    बे दुणे पाच

    माझ्या संपूर्ण वाटचाली मधील 'बे दुणे पाच ' हे माझ्यामते कठीण नाटक होत. यात मी ४ वेगवेगळ्या भूमिका करायचो. यात माझ्या जवळपास ७५ - ८० एंट्रीज होत्या. मला वाटतं हे अतिशय वेगवान नाटक असल्याने माझ्यासाठी हे मोठे आव्हानच होते.

    प्रयोग - ३३६

  • १९९५

    लेकुरे उदंड झाली

    हे नाटक माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे या प्रथितयश कलाकारांनी आधी हे नाटक केल्याने माझ्यासाठी हे एक आव्हान होतं . पण दिग्दर्शक दिलीप कोल्हटकरांनी माझ्याकडून हे काम बसवून घेतलं आणि अभिषेकी बुवांच संगीत असल्याने गाण्याचीही उत्तम तयारी करणं अत्यावशक होतं . माझ्या दृष्टीने आजवरच्या नाटकांपैकी हे नाटक मला अवघड वाटलं . मात्र या नाटकाने मला प्रचंड आत्मविश्वास दिला.

    प्रयोग - ४००

  • १९९६

    सुंदर मी होणार - १९५

    चार दिवस प्रेमाचे - १०२६

    या नाटकात डॉक्टर श्रीराम लागू, वंदना गुप्ते, रवि पटवर्धन, कविता लाड , डॉक्टर गिरीश ओक अशी सर्व दिग्गज मंडळी होती. या नाटकात मला शास्त्रीय गायकाची भूमिका होती. पण भूमिका करताना जी गाणी मी गायचो ती ऐकून प्रेक्षकांना मी गाणं शिकलोय की काय असं वाटायचं.

    चार दिवस प्रेमाचे हे नाटक रत्नाकर मतकरींनी अवघ्या दोन दिवसात लिहून दिलंय, मात्र लिखाणच इतकं सक्षम आहे कि, यात काही मोठे बदल करावे लागले नाहीत.या नाटकात मी, कविता लाड,अरुण नलावडे , सविता प्रभुणे आम्ही चारच जण काम करत होतो.या नाटकाच वैशिष्ट म्हणजे प्रत्येकजण या नाटकात स्वताला 'रिलेट ' करू शकेल अशी १५-२० मिनिटांची स्कीटस होती. त्यामुळेच प्रेक्षकांनी हे नाटक डोक्यावर घेतले आणि याचे आजवर १०२६ प्रयोग झाले.

    एकूण प्रयोग - १२२१

  • १९९७

    शुss कुठे बोलायचं नाही

    या नाटकाबद्दल काय बोलाव हेच सुचत नाहीय.या नाटकात मी, कविता लाड, वंदना गुप्ते, अरुण नलावडे, शाम पोंक्षे असे कलाकार होतो. आम्हाला तालमींमध्ये हि काहीच कळत नव्हते,कि आम्ही हे काय करतोय.मात्र हे नाटक एकदा टी.व्ही. वरुन दाखवल्यानंतर मला आजही हे नाटक पुन्हा केव्हा करणार अशी विचारणा करणारे अनेक मेल्स येतात.पण खरं सांगायचं तर मी आजही संभ्रमावस्थेतच आहे.

    प्रयोग - २८४

  • २००१

    एका लग्नाची गोष्ट - १५०६

    मोरूची मावशी - ११

    व्यक्ति आणि वल्ली - १४

    एका लग्नाची गोष्ट - खरं सांगायचं तर ज्यावेळी हे नाटक आम्हाला कोणालाच आवडलं नव्हतं . त्यामुळे जवळपास ९-१० वेळा हे नाटक लिहिलं गेलं. मला आठवत १८ व्या प्रयोगाच्या वेळी गडकरीला जेव्हा नाटकातील सूत्रधार विचरतो आता पुढे काय करायचं तेव्हा प्रेक्षकामधून आता नाटक बंद करा असा आवाज आला त्यावेळी आमच्या सर्वांचा ठोकाच चुकला होता. मग आम्ही सगळेच जण त्या रात्री बसून त्त्यावर विचार केला आणि पुन्हा आम्ही अंक बसवला मग मात्र २२ व्या प्रयोगापासून ८५० प्रयोगापर्यंत हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.कविता लाडने नाटक सोडल्यानंतर सुजाता जोशीने हे नाटक केलं आणि या नाटकाचे एकूण १५०६ प्रयोग झाले.

    मोरूची मावशी - लेखक : प्रल्हाद केशव अत्रे, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण
    दिग्दर्शक : दिलीप कोल्हटकर

    व्यक्ति आणि वल्ली - हे नाटक खास अमेरिका दौऱ्यात सादर केले होते.

    प्रयोग - १५२१

  • २००१

    लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड

    १९९४ मध्ये माझ्या गेला माधव,प्रियतमा,चल काहीतरीच काय,बे दुने पाच या नाटकांचे धुमधडाक्यात प्रयोग सुरु होते.त्यामुळे ३६५ दिवसामध्ये ४५२ प्रयोग झाले हा एक लिम्का रेकॉर्ड झाला. १८ जानेवारी २००१ ला मी एकाच दिवशी ५ प्रयोग करायचे ठरवलं अर्थात त्याचं नियोजनहि केलं होतं .सकाळी ७ वाजता पहिला प्रयोग सुरु झाला तो रात्री ११.५५ ला पाचव्या प्रयोगाचा पडदा पडला.हा माझा लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाला.यात गेला माधवचे २ प्रयोग, एका लग्नाची गोष्ट १ आणि चार दिवस प्रेमाचे २ प्रयोगांचा समावेश होता. व्यक्ति आणि वल्ली चे USA आणि Canada मध्ये बरेच show केले.

  • २००४

    जादू तेरी नजर

    रात्नाकार मतकरी लिखित हे सांगितीक नाटकामध्ये मी, सतीश तारे , संदीप पाठक , अनिरूध जोशी , शलाका पवार आणि सुजाता जोशी अशी टीम होती .या नाटकाच वैशिष्ट म्हणजे मंगेश कदमने हे नाटक २ वेळा बसवलं . या नाटकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वप्नवत नेपथ्य प्रदीप मुळेनी केलं होतं आणि अशोक पत्कीनी अतिशय सुरेख संगीत दिलं .माझ्या मते हे एक सर्वांगसुंदर नाटक होतं .ज्यात लेखन. नैपथ्य ,संगीत सारंच दमदार होतं. मात्र याचे ५००च्या जवळपास प्रयोग झाले.

    प्रयोग - ३७५

  • २००५

    ७७७७ प्रयोग

    २९ ऑगस्ट २००५ हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा असा टप्पा होता. कारण या दिवशी मी माझ्या कारकिदितील ७७७७ वा प्रयोग करत होतो . ज्याला माजी मुखमंत्री कै . विलासरावजी देशमुख उपस्तीत होते.नेमका याच वर्षी लातूरला भूकंप झाल्याने या प्रयोगाच्या निमित्ताने मी रु . ७७,७७७ चा धनादेश दिला होता. बालगंधर्व ,पुणे येथे झालेल्या या प्रयोगाला पुणेकर रसिकांनी भरभूरून प्रतिसाद दिला.

  • २००६

    आम्ही दोघं राजा राणी

    डॉ.समीर कुलकर्णी लिखित आम्ही दोघं राजाराणीचा विषय हा गंभीर होता.या नाटकात मी, सुप्रिया पिळगांवकर,शाम पोंक्षे , निता पेंडसे अशी टीम जमली होती. मी विनोदी नाटकात काम करत असल्याने मी जरी चेहरा वाकडा केला तरी प्रक्षाकांमधून लाफ्टर येई त्यामुळे गंभीर विषय हाताळताना कोणत्या गोष्टींची खबरदारी द्यावी हे या नाटकामुळे शिकायला मिळाले.

    प्रयोग - १९२

  • २००८

    ओळख ना पाळख

    गेला माधव कुणीकडे (रिलॉचं)

    आजपर्यंतच्या कारकिर्दीत मला कधीही 'पोलिसा' ची भूमिका करायला मिळाली नव्हती. मात्र या नाटकामध्ये माझी ही ईच्छा पूर्ण झाली. मंगेश कदमने दिग्दर्शन तर केलंच पण यात एक भूमिकाही केली. पण प्रांजळपणे कबुल करायचे झाले तर नाटकाची कथा थोडी कमी कसदार होती. पण तरीही आम्ही हे नाटक जोरात करत होतो. या साली अजून एक महत्वाची घटना म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये पहिल्यांदाच नाटकासाठी ऑनलाईन बुकिंग सुरु झाले.अजूनही हिंदी, इंग्लिश, गुजराथी नाटकांच ऑनलाईन बुकिंग नाही, पण मला आनंद आहे हा मान आपल्या मराठी नाटकाला मिळाला.

    नाट्यनिर्माता झाल्यावर मी माझं आवडत नाटक गेला माधव कुणीकडे हे नाटक पु:न्हा रंगभूमीवर लॉंच केलं.

    प्रयोग - २९०

  • २००९

    बहुरूपी

    या नाटकाचा इतिहास वेगळा आहे . २ वर्ष हे नाटक सुयोग नाट्यसंस्थेकडे होतं . पण मी नाट्यनिर्माता झाल्यावर लेखक शेखर ढवळीकरने मला या नाटकाबाबत विचारणा केली. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात वेगळा रोल होता. यात माझी दुहेरी भूमिका होती. मी हे नाटक मनापासून एन्जॉय करत होतो.

    एकूण प्रयोग - २०२

  • २०१०

    श्री तशी सौ

    श्री तशी सौ हे नाटक बंद होऊनही ८ वर्ष झाली होती. यात वंदना गुप्ते होत्या. त्यांची एनर्जी तर नेहमीच थक्क करणारी असते. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते हे पाहूनच मी नव्या संचात हे नाटक रसिकांसमोर आणलं.

    प्रयोग - ९१

  • २०११

    सासू माझी ढासू

    मिफ्ता अवॉर्डच्या दरम्यान माझी आणी रीमा ताईची भेट झाली होती. त्यावेळी रीमा ताईने एखादया विनोदी नाटकात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे मी सासू माझी ढासू ची कथा घेऊन तिला वाचून दाखवली होती. ते तिला आवडलं. या नाटकाची ६ दिवसांत तालीम करून, आमची रंगीत तालीम होऊन हे नाटक रंगभूमीवर आलं आतापर्यंत सर्वात वेगाने बसलेले नाटक असा याचा उल्लेख करता येईल.

    प्रयोग - २००

  • २०१२

    माझिया भाऊजींना रीत कळेना

    थिएटर स्कूल

    संतोष पवार हे अजब रसायन काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता मला पूर्वीपासून होती त्यामुळेच मी हे नाटक करायला घेतलं. या नाटकाद्वारे मी आणि कविता पुन्हा एकदा तब्बल १० वर्षांनी एकत्र काम करतोय.

    थिएटर स्कूल
    जेंव्हा मी माझ्या आजुबाजुला या क्षेत्रात धडपड करणारे तरुण-तरुणी पाहतो तेंव्हा मला एक गोष्ट जाणवली कि या क्षेत्रात येण्यासाठी लागणारे आवश्यक ते ज्ञान नाही, पण नुसतंच त्यांना प्रसिद्धीचा मोह आहे. या क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन मुलांना शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावं यासाठी मी पुण्यामध्ये ११ जानेवारी २०१२ ला थिएटर स्कूलची स्थापना केली. आजवर त्याच्या ३ ब्याचेस बाहेर पडल्या आहेत.

    माझ्या एकूणच कारकीर्दीमध्ये माझ्या वाट्याला आलेल्या चांगल्या कथा, उत्तम सहकलाकार, दिग्दर्शक तसेच माझ्या कुटुंबियांच्या पाठींब्यामूळे मी हा टप्पा गाठू शकलो. अर्थात पुढील कारकीर्दीमध्ये माझ्या मायबाप रसिकांचे असेच आशीर्वाद पाठी राहोत अशी आशा बाळगतो.

    प्रयोग - ५१

  • २०१३

    नकळत दिसले सारे

    या नाटकात दोनच पात्र होती आणि दोन्हीही दृष्टीहीन होती. गॉगल न लावता डोळे उघडे ठेवून दिसत नाही असा अभिनय करणं हा एक मोठा चॅलेंज होता. पण दिग्दर्शक योगेश समोर यांनी कडी मेहनत करून घेतली. कानाने बघणे म्हणजे काय हे या नाटकामुळे कळले.

    प्रयोग - ५६

  • २०१५

    कार्टी काळजात घुसली

    ह्या नाटकापर्यंत मी माझ्या वयाच्या एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलो होतो. यंग अँड डॅशिंग हिरो मी करू शकणार नव्हतो. कॅरेक्टर भूमिकांमध्ये जाणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने कार्टी काळजात घुसली हे नाटक मला फारच उपयोगी पडले. तेजश्री प्रधान लाही नाटक करायचं होतं आणि मलाही वडिलांचा रोल करायचा होता त्यामुळे हे जमून गेलं.

    प्रयोग - २७०

  • २०१५

    संगीत संशयकल्लोळ

    नाटककार गो ब देवल यांचे हे नाटक आधी तसबीरीचा घोटाळा उर्फ फाल्गूनरावाचा फार्स ह्या नावाने आले होते. नंतर हे नाटक गाण्यांनी सजवले गेले आणि म्हणून मग त्याचं नाव संगीत संशयकल्लोळ असे ठेवले गेले.
    १८९४ ते १९१६ पर्यंत हे नाटक तसबीरीचा घोटाळा उर्फ फाल्गूनरावाचा फार्स ह्या नावाने सादर होत होतं. १९१६ ला गंधर्व नाटक मंडळींनी, देवल मास्तरांकडून गाणी लिहुन घेतली आणि सं. संशयकल्लोळ या नावाने संगीत नाटक केले.

    प्रयोग - ९८

  • २०१६

    साखर खाल्लेला माणूस

    हे नाटक डायबिटीस डायबिटीस वर असेल असं लोकांना अजिबात वाटलं नव्हतं पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष बघितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अतिशय गंभीर गोष्ट विनोदी पद्धती सांगितली तर ती पटकन कळते या नाटकामुळे परत एकदा सिद्ध झाले.

    प्रयोग - ३९४

  • २०१८

    एका लग्नाची पुढची गोष्ट

    एका लग्नाची गोष्ट जे दाखवतो त्याचा हा मागोमाग येणारा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. नात्यांची जी गंमत आहे ती अनुभवाची असेल तर हे नाटक पाहायलाच हवे

    प्रयोग - ५१७

  • २०२२

    सारखं काहीतरी होतंय

    ह्या नाटकातला नायक कशाला तरी घाबरतोय पण तो नक्की कशाला घाबरतोय हे प्रत्यक्ष बघणं खूपच गमतीशीर आहे

    प्रयोग - ७३

  • २०२४

    गेला माधव कुणीकडे

    अरे हाय काय अन् नाय काय'... माधव परत येतोय; 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा पुन्हा शुभारंभ

    प्रयोग - ६६

  • २०२४

    शिकायला गेलो एक

    महेश साने, पुण्यातील साधे व प्रामाणिक शिक्षक, नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाले. आमदार त्यांचा खोडकर मुलगा श्यामला शिकवणीसाठी आणतात, आणि या अद्भुत प्रवासाची सुरुवात होते.

    प्रयोग - ११

+ -
©. Prashant Damle      :::| powered by dimakh consultants |:::
Bookmark and Share
Visit My Website